अभ्यंग आरोग्याची गुरुकिल्ली

संजीवनी योगचिकित्सा केंद्र अभ्यंग ही नित्य आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. सध्याची जीवनपद्धती पाहता वाढते ताणतणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेगवान जीवन, प्रदूषित हवा, हे सर्व शरीराचे बल कमी करणे तसेच शरीर-ननाला थकविणारे आहे. यावर अभ्यंग हा उत्तम उपाय असून शरीर-ननाची बल वाढवून थकवादेखील दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अथात अभ्यगाचा केवल नयादित विचार न करता त्याचे बाकी फायदेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अभ्यंग शरीरातील दोष शाखांकडून कोष्ठाकडे पाठविण्यास व तेथून ते बाहेर टाकण्यास नदत करते. म्हणून एक उत्तम शरीरशुद्धी प्रक्रिया । म्हणूनही याकडे पाहण्यास हरकत नाही. तसेच स्नायूंचा कडककपणा दूर करुन नसांवरचे प्रेशर दूर करण्यासाठी अभ्यंगाची नदत होते. त्यातूनच विविध प्रकारच्या वेदना दूर होण्यास नदत होते. त्याचप्रनणे अभ्यंगामुळे रक्ताभिसरण चांगले सुधारुन शरीराचे चलनवलन उत्तम प्रकारे होण्यासही साहाय्य होते. चयापचय क्रिया सुधारते, शरीराचा पोत सुधारतो, म्हणजेच सतेज वर्ण प्राप्त होतो. अभ्यंगामुळे शरीरावर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. तारुण्य टिकवून ठेवण्यास नदत होते. किंबहुना वार्धक्य लांबविता येणेही शक्य असते. स्नायूंची लवचिकता वाढून सर्व इंद्रिये दृढ होतात. तसेच शरीरसौष्ठव सुधारते व टिकून राहते. शरीराच्या आरोग्याचे तंत्र ज्यावर अवलंबून असते, तो वातदोष प्राकृत व संतुलित राहिला तर रक्ताभिसरण संस्था, स्नाय व अस्थि संस्था तसेच चेतासंस्थांशी संबंधित विकारही बरे होण्यास मदत रोते एकंदरीतच शरीर ननावरचा आणि मेंदवरचा ताण अभ्यंगाने कमी होऊन निघून जात असल्याने, तसेच सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होण्यास नदत होत असल्याने व्याधिनुक्तीसाठी आणि स्वास्थ्यरक्षणासाठी बाराही महिने नित्य अभ्यंग व नसाज घेत जाणे हिताचे आहे. नियनित अभ्यंग घेतल्याने, तसेच स्वेदन घेतल्यानेदेखील वजन नियंत्रित राहण्यास नदत होते. संजीवनी योगचिकित्सा केंद्रामध्ये व्यक्तिश: प्रत्येकाच्या प्रकृतीरुप तेलाची सांगड घालून तसेच तज्ज्ञ व प्रशिक्षित व्यक्तींकटनच अभ्यंग नसाज देण्याची सोय आहे .